विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई, दि. 24 – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्याबाबतची माहिती त्यांनी सोशल माध्यमातून दिली आहे. ते म्हणाले की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी.

माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: