अग्रवाल परिवार, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडतर्फे बोरा हॉस्पिटल कोविड सेंटरला व्हेंटिलेटर भेट

पुणे : अग्रवाल परिवार आणि लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड यांच्या वतीने गणेश पेठ परिसरातील बोरा हॉस्पिटल कोविड सेंटरला व्हेंटिलेटर मशीन भेट देण्यात आले. लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल लायन अभय शास्त्री व अग्रवाल कुटुंबियांच्या हस्ते हे व्हेंटिलेंटर मशीन हॉस्पिटलचे डॉ. महेश बोरा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

प्रसंगी लायन्स क्लब ऑफ पुना गणेशखिंडचे अध्यक्ष ज्योतिकुमार अगरवाल, अग्रवाल परिवारातील जगदीशप्रसाद अग्रवाल, उद्योजक श्याम अग्रवाल व विजय अग्रवाल, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडचे विजय भंडारी, द्वारका जालान, श्याम खंडेलवाल, महेंद्र गादिया, अजय जैन, कुरेश पोलन, कांतीलाल पालेशा, राकेश मित्तल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लायन्स अभय शास्त्री म्हणाले, “कोरोना महामारीचा सामना करताना गरजुंसाठी मदतीचा हात पुढे करण्यात येतोय, ही बाब सकारात्मक आहे. आजच्या परिस्थितीत रुग्णालयाकरीता व्हेंटिलेटर खूप गरजेची गोष्ट आहे. अग्रवाल परिवार यांनी व्हेंटिलेटर मशीन भेट देत माणुसकीचे काम केले आहे. लायन्स क्लब गणेशखिंडच्या माध्यमातून निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. क्लबमधील सर्व सभासद यामध्ये मनापासून सहभागी होत आहेत, हे पाहून आनंद होतो.”

डॉ. महेश बोरा म्हणाले, “हॉस्पिटलच्या कोविड सेंटरला व्हेंटिलेटर भेट दिल्याबद्दल अग्रवाल परिवार आणि लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडचा आभारी आहे. गेल्या सहा-सात महिन्यापासून सर्व डॉक्टर, नर्स, इतर कर्मचारी मेहनत घेत काम करत आहे. रुग्णाला बरे करण्यासाठी झटत आहेत. रुग्णांना उपचार करताना व्हेंटिलेटर मशीनचा खूप उपयोग होईल.” द्वारका जालान यांनी आभार मानले. यावेळी येथील नियोजन पाहणारे, तसेच डॉक्टर्स यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: