रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये वक्तृत्व स्पर्धेस प्रतिसाद  

 पुणे:  महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या  एम.ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च मध्ये  ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.विद्यार्ध्यांनी ‘डॉ.ऐ. पी. जे.अब्दुल कलाम’ व ‘महात्मा गांधी’ यांच्या जीवनावर आधारित तसेच ‘कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर प्रतिकार शक्ती कशी वाढवावी’ इत्यादी विविध विषयांव सादरीकरण केले . ऑनलाईन स्पर्धेसाठी मुमताज शेख,पुनीत बसन, यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सिमरणजित सिंग यांना प्रथम पारितोषिक तसेच कुमारी श्रावणी एरंडकर व कुमारी सिद्रा शेख यांना उत्तेजनार्थ पारितोषिक घोषित करण्यातआले.विजेत्यांचा सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल सौ चंदा सुपेकर यांनी प्रॉ.इम्रान सय्यद,विभागप्रमुख रुकय्या चागलानी यांच्या मदतीने केले होते.या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनिता फ्रान्झ यांचे मार्गदर्शन लाभले.दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी  दिवंगत राष्ट्राध्यक्ष डॉ.ऐ. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने वाचन प्रेरणा दिन उपक्रमांतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: