रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आंबेडकर चळवळ गतिमान करा – किरण घोंगडे

युवा नेते प्रंशात हनुमंते दांडेगावकर,मंगेश कांबळे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला प्रवेश.

वसमत – रिपब्लिकन सेनेचा पक्षप्रवेश सोहळा शासकीय विश्राम गृह वसमत येथे संपन्न झाला .या वेळी अनेकांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष कैलास जोंधळे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाप्रमुख किरण घोंगडे बोलत होते,पुढे म्हणाले कि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु सरसेनानी आंनदराज आंबेडकर हे आंबेडकर चळवळीचे खरे वाहक आहेत आणि तेच आंबेडकरी युवकांना सत्तेत पोहचून न्याय देऊ शकतात म्हणून युवकांनी रिपब्लिकन सेनेत सहभागी होऊन खांद्यावर संघर्षशील निळा झेंडा खांद्यावर घेऊन आंबेडकर चळवळ गतिमान करावी असे आवाहन जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांनी केले,

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नेते राहुल पुंडगे, युवा जिल्हा प्रमुख विकिभाऊ काशिदे, युवा जिल्हा नेते नितीन खिल्लारे,जिल्हा उपाध्यक्ष पंडित खिल्लारे, जिल्हा संघटक चांदु नादरे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,युवा जिल्हा उपाध्यक्ष देवा कांबळे, विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष धम्मपाल काळे,युवा जिल्हा उपाध्यक्ष संदिप थोरात, युवा शहराध्यक्ष नितीन गव्हाने, उपाध्यक्ष विनोद जोगदंड, युवा तालुका उपाध्यक्ष यशवंतराव साळवे,अक्षय साबळे,अशिष इंगोले, सतिश इंगोले,उपस्थित होते,सुत्रसंचालन तालुका महासचिव राहुल औंटे यांनी केले तर आभार युवा जिल्हा महासचिव आकाश दातार यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: