हस्थर पुन्हा येणार – ‘तुंबाड’ चा सिक्वेल लवकरच

दोन वर्षापूर्वी तुंबाड हा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटाची फार जाहिरात किंवा प्रमोशन झाले नसताना केवळ प्रेक्षकांच्या बळावर हा चित्रपट गाजला. काही दिवसांपूर्वी ट्विटरवरही तुंबाड सर्वोत्कृष्ट सिनेमा असल्याचा निर्वाळा नेटकर्‍यांनी दिला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. तुंबाडमधील मुख्य अभिनेता आणि निर्माता सोहम शाह याने ही माहिती दिली आहे.

इकॉनॉमिक टाईम्सला मुलाखत देताना सोहम शाह म्हणाला की, तुंबाडच्या दुसर्‍या भागाचे लिखाण सुरू आहे. दुसर्‍या भागाची कथा अजून पूर्ण झाली नसून त्याची प्रक्रिया सुरू आहे. नवीन भागात आम्ही अनेक गोष्टी जोडणार आहोत त्यासाठी खूप वेळ लागेल असे सोहमने सांगितले.

तुंबाड हा चित्रपट नारायण धारप यांच्या आजी आणि बळी या दोन कथांवर आधारित होता. हा चित्रपट आधी तीन भागात बनणार होता. पण दिग्दर्शक राही बर्वे यांनी एकाच भागात ही कथा सांगितली आहे. तसेच तुंबाडवर आता आणखी काम करण्याची इच्छा नसल्याचेही राही यांनी म्हटले होते. राही बर्वे सध्या जी ए कुलकर्णी यांच्या विदुषक कथेवर आधारित चित्रपट बनवत आहेत. त्याचा पोस्टरही त्यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून शेअर केला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: