IPL 2020 – दिल्लीचा कोलकाता वर 18 धावांनी विजय

शारजा :IPL 2020 च्या 16 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने शारजा क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सचा 18 धावांनी पराभव केला आहे. स्पर्धेतला हा त्यांचा तिसरा विजय आहे. तर कोलकाताचा हा दुसरा पराभव आहे. कोलकाता संघ विजयाच्या  229 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमवत 210 धावा करू शकला. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांनी अर्धशतक ठोकले.

नितीश राणाने 35 बॉलमध्ये 58 धावा केल्या. शुभमन गिलने 22 बॉलमध्ये 28 धावा केला. सुनील नरेनने 5 रन केले. रसेलने 8 बॉलमध्ये 13 धावा केल्या. दिनेश कार्तिक 6 धाव करत आऊट झाला.

दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट गमवत 228 धावा केल्या होत्या. कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 88 धावा केल्या. त्याने 38 चेंडूत 7 फोर आणि 6 सिक्स ठोकले. अय्यरने 27 बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. आयपीएलमधील या सीजनमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. शिखर धवनने 16 बॉलमध्ये 26 धावा केल्या. पृथ्वी शॉने 41 बॉलमध्ये 66 धावांवर केल्या. त्याने 4 फोर आणि 4 सिक्स ठोकले. पंतने 17 बॉलमध्ये 38 धावा केल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: