मित्तल परिवार, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडतर्फे
जीतो कोविड सेंटरला व्हेंटिलेटर भेट

पुणे : मित्तल परिवार आणि लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड यांच्या वतीने घोले रस्त्यावरील ‘जीतो’ कोविड सेंटरला व्हेंटिलेटर मशीन भेट देण्यात आले. हॉटेल नंदनवन येथे ‘जीतो’ने कोविड सेंटर उभारले असून, शेकडो रुग्णांवर अद्ययावत उपचार केले जात आहेत. याच कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या मित्तल परिवाराने हे व्हेंटिलेटर मशीन दिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त लायन्स क्लबतर्फे आयोजित सेवा सप्ताहांतर्गत हा कार्यक्रम झाला.

लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल लायन अभय शास्त्री, गणेशखिंड क्लबचे अध्यक्ष ज्योतिकुमार अगरवाल व मित्तल परिवारातील सदस्यांच्या हस्ते हे व्हेंटिलेंटर मशीन सुपूर्त करण्यात आले. प्रसंगी ‘जीतो’चे पदाधिकारी विजय भंडारी, कांतीलाल ओसवाल, ओमप्रकाश रांका, राजेश सांकला, इंदर छाजेड, ऍड. एस. के. जैन, अचल जैन, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडचे अध्यक्ष ज्योतीकुमार अगरवाल, द्वारका जालान, शाम खंडेलवाल, राजेंद्र गोयल, मित्तल परिवारातील सुभाष मित्तल, अनिल मित्तल, राकेश मित्तल, रितेश मित्तल, प्रवीणकुमार अगरवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
अभय शास्त्री म्हणाले, “सेवा हेच कर्तव्य मानून ‘जीतो’ने केलेले काम कौतुकास्पद आहे. पुण्यात दोन कोविड सेंटर उभारून ‘जीतो’ शेकडो लोकांना चांगली आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे. मित्तल परिवाराने कृतज्ञतेच्या भावनेतून दिलेले हे व्हेंटिलेटर मशीन गरजूंवर उपचारासाठी उपयुक्त ठरेल.” विजय भंडारी यांनी कोविड सेंटरमधील सोयीसुविधांविषयी सांगितले. यावेळी येथील नियोजन पाहणारे, तसेच डॉक्टर्स यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: