पीएमपीच्या अध्यक्षपदी राजेंद्र जगताप
पुणे:पीएमपीच्या (पुणे परिवहन महामंडळ ) अध्यक्ष व संचालकपदी राजेंद्र जगताप यांची नियुक्त राज्य सरकारकडुन करण्यात आली आहे. पीएमपीची सेवा अधिक चांगली आणि आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचा आपला प्रयत्न राहील असे जगताप यांनी सांगितले.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त , स्मार्ट सिटीचे मुख्य अधिकारी म्हणून जगताप यांनी काम पाहिले आहे. त्यांना शहरातील प्रश्नासंदर्भात माहिती आहे. भारतीय संरक्षण सेवा विभागाचे ते अधिकारी आहेत 2012 पासून ते प्रतिनियुक्तीवर राज्यशासनाच्या सेवेत आले आहेत. स्मार्ट सिटीमधील पदाची जबाबदारी सोडल्यानंतर ते आठ महिने नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि पीएमआरडीच्या आयुक्तपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी पीएमपीला ई-बसची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. पुणेकरांसाठी अधिक चांगली वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पीएमपी ही स्वतंत्र खासगी कंपनी असली तरी पुणे आणि पिंपरी- चिंचवड या दोन्ही महापालिकांसाठी एक महत्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. ग्रामिण भागात सुध्दा पीएमपीची सेवा आहे. त्यामुळे अधि चांगली व्यवस्था निर्माण करु असे ते म्हणाले.
