Saturday, April 4, 2026
NATIONAL

पाकिस्तानी कट्टर मुस्लिम नेत्याने १७०० वर्षे पुरातन बुद्ध मूर्ती फोडली

कराची, दि. १९ – पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांतातील तख्त-ए-बाही भागातील एका घराचे खोदकाम सुरू असताना सापडलेली १७०० वर्षे पुरातन बुद्ध मूर्ती स्थानिक कंत्राटदाराने हातोड्याने फोडून उध्वस्त करून टाकल्याची घटना नुकतीच घडली आहे. एका कट्टर मुस्लिम नेत्याच्या चिथावणीवरून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

इस्लाममध्ये मूर्तीपूजा आणि मूर्तीचे अवशेष गैर-इस्लामिक मानले जाते. त्यामुळे या नेत्याने कंत्राटदाराला ही मूर्ती तोडण्यास सांगितले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पुरातत्व विभागाचे संचालक अब्दुल समद यांनी या घटनेची चौकशी करून संबंधितांना लवकरच अटक केली जाईल असे म्हटले आहे.

एका घराचा पाया खोदला जात असताना कामगारांना तिथे जमिनीत ही बुद्धांची मूर्ती आढळून आली. ही माहिती कळताच एका कट्टर मुस्लिम नेत्याने तिथे येऊन ही मूर्ती कंत्राटदार आणि कामगारांना फोडून टाकण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी ती तोडली. हा भाग ऐतिहासिक पर्यटन क्षेत्र आहे. याठिकाणी श्रीलंका, कोरिया आणि जपानी लोक मोठ्या संख्येने भेट देत असतात. या परिसरात प्रथम दशकात बौद्ध मठाची स्थापना करण्यात आली होती. सम्राट अशोक राजा आणि बौद्ध काळाच्या तेरा-चौदाव्या शतकातील प्राचीन स्थळे याठिकाणी आजही आढळून येतात. बुद्ध मूर्ती आणि शयन स्तूपही या ठिकाणी सापडले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading