दिग्दर्शक संजय जाधव पुन्हा अभिनय करणार

प्रसिद्ध दिग्दर्शक सिनेमॅटोग्राफर, निर्माता संजय जाधव लवकरच वेलडन बेबी या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही घोषणा करण्यात आली आहे.
अमृता खानविलकर, पुष्कर जोग, वंदना गुप्ते अभिनित वेल डन बेबी प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात संजय जाधव यांनीही अभिनय केला आहे. पुष्कर जोग याने ट्विट करून ही माहिती दिली.
