fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

पटेल रुग्णालयात आय.सी.यु.वार्ड तयार करण्यासाठी शासनाकडून 2 कोटी 26 लाख रुपयांच्या निधी

पुणे, दि.18 – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयास २० बेडचे आय.सी.यु.वार्ड तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून 2 कोटी 26 लाख रुपयांच्या निधीचा धनादेश आमदार सुनील कांबळे यांनी आज कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सी.ई.ओ. अमित कुमार यांच्याकडे सुपूर्त केला. त्यामुळे या रुग्णालयातील आय.सी.यू. वार्ड लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दि. 22 मे रोजी आमदार सुनील कांबळे यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना पत्र देऊन निधीची मागणी केली होती. व त्याचा वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य शासनाने ३ कोटी 26 लाख रुपयाचा निधी मंजूर केला. त्यातील १कोटी रुपये यापूर्वीच रुग्णालयास देण्यात आले होते. याच बरोबर खासदार गिरीश बापट यांच्या खासदार निधीतून 50 लाख रुपये व आमदार सुनील कांबळे यांच्या आमदार निधीतून 50 लाख रुपये देण्यात आले आहेत. असे आत्तापर्यंत एकूण 4 कोटी 26 लाख रुपये देण्यात आले आहेत. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सी.ई.ओ. अमित कुमार, सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे आर. एम. ओ. डॉ. विद्याधर गायकवाड, बोर्डाच्या नगरसेविका, नगरसेवक तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आजपर्यंत राज्य शासनाने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला कुठलाही निधी दिला नव्हता. परंतु आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या प्रयत्नांमुळे पहिल्यांदा अशा प्रकारचा निधी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला मिळाला असल्याचे सी. ई.ओ.अमित कुमार व नगरसेवकांनी सांगितले व आभार मानले.
कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या या हॉस्पिटलने कोविड-19 रुग्णांसाठी 450 बेड तसेच 20 बेडचा आय.सी.यु वार्ड तयार करून रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. आणि आज पर्यंत एक हजार पेक्षा जास्त रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेल्याचे सांगून रुग्णालयाचे कौतुक केले. तसेच यापुढे रुग्णांच्या उपचारासाठी काही निधी कमी पडल्यास राज्य शासनाकडे प्रयत्न करून निधी मिळवून दिला जाईल. असे आश्वासन यावेळी आमदार सुनील कांबळे यांनी दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading