fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

उर्दू  माध्यमातील विद्यार्थ्यांना देशात प्रथमच ई-लर्निंगची सुविधा

उर्दू माध्यमातील दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अॅनिमेटेड ई -लर्निंग सॉफ्टवेअर, टॅब, पेन ड्राईव्ह

पुणे, दि. 17 – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पै आयसीटी ऍकेडमी’ ने पहिली ते दहावी उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी अॅनिमेटेड ई -लर्निंग सॉफ्टवेअर तयार केले असून ‘आदील प्रकाशन’च्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांसाठी उपलब्ध केले आहे.

या सॉफ्टवेअरचे लोकार्पण महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार, आदिल प्रकाशनचे संचालक कामील शेख, सौ. आफरोझ कामिल शेख यांच्या हस्ते झाले.

हे सॉफ्टवेअर माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञ तन्वीर इनामदार यांनी तयार केले आहे. देशातील अशा स्वरूपाचे हे पहिले सॉफ्टवेअर आहे. शासनाच्या अभ्यासक्रमाला अनुसरून पाठयपुस्तकातील धडयांना अॅनिमेशन, चित्रे, आणि संगीतातून सुलभरित्या समजण्याची सुविधा देशात प्रथमच यामुळे उपलब्ध झाली आहे.

डेस्कटॉप-लॅपटॉप संगणक,मोबाईल, आणि टॅबवर हे सॉफ्टवेअर चालते आणि अभ्यासक्रमाप्रमाणे दरवर्षी सुधारित आवृत्ती वापरता येते,अशी माहिती तन्वीर इनामदार यांनी दिली.मेमरी चीप,पेन ड्राईव्ह मधून देखिल वर्षभराचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.पहिली ते दहावीसाठी हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यासाठी अॅप देखील तयार करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात एकूण ७ हजार उर्दू शाळा आहेत.३२ हजार शिक्षक,१८ लाख विद्यार्थी आहेत. त्यांना या उर्दू ई -लर्नीग सुविधेचा लाभ होणार आहे.

‘शिक्षण हेच प्रगतीचे महाद्वार असून अत्याधुनिक संगणकीय शिक्षण प्रणाली गरीब वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. मागे पडलेल्या वर्गाची प्रगती हेच विकसित तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट असायला हवे ‘असे उदगार डॉ पी ए इनामदार यांनी काढले.

कामील शेख,अमीन शेख यांनी प्रात्यक्षिक दाखवले. हे सॉफ्टवेअर आदिल प्रकाशन नाना पेठ पुणे येथे उपलब्ध आहे. त्यासाठी ९५९५७४८५८५ क्रमांकावर संपर्क साधता येईल.email : aadilpublication8585@gmail.com अधिक माहिती http://www.aadilpublication.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading