HSC – १२वीचा निकाल जाहीर!९०.६६ टक्के निकाल
पुणे, दि. १६ – राज्य शिक्षण मंडळाचा १२वीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. नेहमीपेक्षा सुमारे दीड महिना उशिरा हे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यभर १२वीच्या निकालांची आकडेवारी ९०.६६ टक्के इतकी झाली आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल ९६.९३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९१.२७ टक्के तर कला शाखेचा निकाल ८२.६३ टक्के इतका लागला आहे. याही वर्षी कोकण विभागाची १२वीच्या परीक्षांमध्ये सरशी झाली असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के इतका लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.१८ टक्के इतका लागला आहे.

या वर्षी १४ लाख २० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख १३ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १२ लाख ८१ हजार ७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाच्या निकालातही विद्यार्थिनींची सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यार्थिनींचा निकाल यंदा ९३.८८ टक्के लागला असून विद्यार्थ्यांचा निकाल ८८.०४ टक्के इतका लागला आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.५७ टक्के इतका लागला आहे.
यंदाच्या परीक्षेचं आणखी एक विशेष म्हणजे एकूण १५४ विषयांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या, त्यातल्या तब्बल २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
12 वीचा निकाल ऑनलाईन कसा पहाल ?
mahresult.nic.in ही वेबसाईट ओपन करा.
अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल. त्यानंतर HSC Examination Result 2020 वर क्लिक करा. आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडिरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर आणि आईचं नाव टाईप करायचं आहे. त्यापुढे View Result वर क्लिक करा. तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल. तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.
निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स
mahresult.nic.in,
maharashtraeducation.com
results.mkcl.org
mahahsscboard.maharashtra.gov.in,
mahahsscboard.in
– १२ निकाल एका नजरेत
– राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के
– यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला
– निकालात मुलींचीच बाजी
– मुलींचा निकाल ९३.८८टक्के
– मुलांचा निकाल ८८.०४ टक्के
– कला शाखा निकाल : ८२.६३ टक्के
– वाणिज्य शाखा निकाल : ९१.२७ टक्के
– विज्ञान शाखा निकाल : ९६.९३ टक्के
– MCVC : ९५.०७ टक्के
– कोकण विभागाची निकालात बाजी, कोकणचा निकाल ९५.८९
– सर्वात कमी औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के
