विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’चा ट्रेलर ट्रेंडिंग
बहुचर्चित ‘शकुंतला देवी’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या चित्रपटामध्ये अभिनेत्री विद्या बालनने शकुंतला देवीची भूमिका साकारली आहे. शकुंतला देवी या अविश्वसनीयरित्या क्लिष्ट गणित जलदपणे सोडवण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी ‘मानवी संगणक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध गणितज्ञ असण्यासोबतच त्यांच्या काळातील एक अग्रणी महिला होत्या. त्या त्यांच्या मर्जीप्रमाणे जीवन जगल्या आणि अगदी नियंत्रितपणे ते साध्य केले. हा चित्रपट गणितज्ञ शकुंतला देवीबाबत असण्यासोबतच हुशार, असुरक्षित व मर्यादित असलेली महिला व आई शकुंतलाबाबत देखील आहे.

चित्रपट शकुंतला देवीचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले असून आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रॉडक्शन्स व विक्रम मल्होत्रा (एबंडंशिया एंटरटेन्मेंट) यांची निर्मिती असलेल्या या आत्मचरित्रावर आधारित चित्रपटामध्ये सन्या मल्होत्रा देखील आहे. ती शंकुतला देवीच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. शंकुतला देवीचे तिच्या मुलीसोबत जटिल, पण असाधारण नाते होते. तसेच या चित्रपटामध्ये जीशू सेनगुप्ता आणि अमित साध हे देखील आहेत. अनु मेनन व नयनिका महतानी यांनी पटकथा लेखन केले असून इशिता मोएत्राने संवाद लेखन केले आहे.
अभिनेत्री विद्या बालन म्हणाली, ”शकुंतला देवी यांच्या विश्वामध्ये सामावून जाण्याचा अनुभव साहसी व प्रेरणादायी होता. त्यांची कथा प्रेरणादायी आहे आणि तुम्हाला प्रेरणा देते की, आपला स्वत:वर विश्वास असेल तर जग आपल्या मुठीत असू शकते. प्राइम व्हिडिओवर थेट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट ‘शकुंतला देवी’ जगभरातील प्रेक्षकांच्या जवळ पोहोचेल. ते त्यांच्या सोईनुसार चित्रपट पाहू शकतील.”
दिग्दर्शक अनु मेनन म्हणाले, ”शकुंतला देवी चित्रपटाने माझे नेहमीच लक्ष वेधून घेतले आहे आणि त्यांची अविश्वसनीय कथा आजच्या युगाशी संलग्न आहे. आपल्यापैकी अनेकांना त्यांच्या गणिताबाबत असलेल्या ज्ञानाबाबत माहित आहे. पण हा चित्रपट शकुंतला देवी यांच्या माहित नसलेल्या वैयक्तिक कथेला सादर करतो. त्या एक हुशार, पण असुरक्षित महिला व आई होत्या, ज्यांनी त्यांच्या काळामध्ये स्वत:च्या मर्जीप्रमाणे जीवन जगले. मला विश्वास आहे की, आम्ही या चित्रपटाची निर्मिती करताना जितका आनंद घेतला तितकाच प्रेक्षक चित्रपट पाहण्याचा आनंद घेतील.”
‘शकुंतला देवी’ हा चित्रपट 31 जुलै पासून प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
