Wednesday, June 24, 2026
PUNE

गोयल गंगा इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 

पिंपरी :- पिंपरीच्या गोयल गंगा इंटरनैशनल स्कुल निकाल १०० टक्के लागला असून स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे . एकूण ११८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील सार्थक पवार याला ९८ टक्के, सोमेश्वर पाणीग्रही याला ९६.४ टक्के, वेदांत घोडके याला ९६.४ टक्के, यूषिता कार्ला हिला ९५.६ टक्के ,आयुष्य सोमवंशी ९५.६ टक्के तर विधी बन्सल हिला ९५. ६ टक्के मिळाले आहे.
११८ पैकी ७६ टक्के विद्यार्थ्यांना डिस्टींकशन मिळाले आहे. ११८ पैकी ३१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. विशेष मुलांमधील ५ विद्यार्थ्यांनी ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. सार्थक पवार ,सोमेश्वर पाणिग्रही, विधी बन्सल आणि प्रभाव पटेल यांना गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत. अर्णव सोनावणे या विद्यार्थ्यांला संस्कृत मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत..
शाळेच्या मुख्याध्यापिका भारती भागवाणी म्हणाल्या कि, “केवळ आमच्या मुलांचीच नाही तर देशभरातील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी पाहून मला आनंद झाला. तुमच्या उज्ज्वल भविष्याची ही फक्त सुरुवात आहे. या पुढच्या आयुष्यात सर्वसामान्यांचे जीवन उंचावण्याची आणि देशाचे भविष्य घडविण्याची जबाबदारी आता तुमच्या मजबूत खांद्यांवर आहे हे नेहमी लक्षात ठेवा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading