fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

पुणे विभागातील 27 हजार 931 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे दि. 12 :- पुणे विभागातील 27 हजार 931 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 45 हजार 897 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 16 हजार 483 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 483 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 731 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.86 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.23 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 38 हजार 473 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 23 हजार 591 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 832 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 10 हजार 30, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 2 हजार 820 व पुणे कॅन्टोंन्मेंट 83, खडकी विभागातील 50, ग्रामीण क्षेत्रातील 777, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 72 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 832, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 113 व पुणे कॅन्टोंन्मेंट 24, खडकी विभागातील 15, ग्रामीण क्षेत्रातील 45, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 21 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 558 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.32 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 822 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 509, सातारा जिल्ह्यात 153, सोलापूर जिल्ह्यात 109, सांगली जिल्ह्यात 16 तर कोल्हापूर जिल्ह्यात 35 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 696 रुग्ण असून 1 हजार 10 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 621 आहे. कोरोनाबाधित एकूण 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 3 हजार 930 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 193 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 409 आहे. कोरोना बाधित एकूण 328 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 624 रुग्ण असून 302 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 306 आहे. कोरोना बाधित एकूण 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 1 हजार 174 कोरोना बाधीत रुग्ण असून 835 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 315 आहे. कोरोना बाधित एकूण 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 39 हजार 852 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 34 हजार 207 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 645 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 87 हजार 860 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 45 हजार 897 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 12 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading