कोरोना – राज्यात आज उच्चांक ७ हजार ८६२ रुग्ण आणि २२६ मृत्यू
मुंबई, दि.१०: राज्यात आज ५३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ३२ हजार ६२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८६२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ५३ हजार ९७८ नमुन्यांपैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने पॉझिटिव्ह (१९.०१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ७४ हजार २५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ५६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज २२६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१५ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले २२६ मृत्यू हे मुंबई मनपा-७३, ठाणे-९, ठाणे मनपा-८, नवी मुंबई मनपा-१२, कल्याण-डोंबिवली मनपा-१०, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी-निजापूर मनपा-८, मीरा-भाईंदर मनपा-१, पालघर-१, वसई-विरार मनपा-९, रायगड-३, पनवेल मनपा-६, नाशिक-१, नाशिक मनपा-४, धुळे मनपा-४, जळगाव-४, जळगाव मनपा-३, नंदूरबार-२, पुणे-५, पुणे मनपा-२१, पिंपरी-चिंचवड मनपा-११,सोलापूर-२, सोलापूर मनपा-३, कोल्हापूर-१, सांगली-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-५, औरंगाबाद मनपा-४, जालना-१, हिंगोली-१, परभणी-१, लातूर-१, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-३, वाशिम-१, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे. दरम्यान, आज रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एप्रिल ते जून २०२० या कालावधीतील इतर कारणांमुळे झालेले २७५ मृत्यू कळविले आहेत.
