Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

गणेशोत्सव- कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध – उदय सामंत

मुंबई, दि.१० : देशातील वेगवेगळ्या भागातून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संगितले.


आज सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

श्री.सामंत म्हणाले, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात (कॉरटाइन ) चौदा दिवस ठेवण्यापेक्षा सात दिवस ठेवणे,त्यांना कोकणात गणेशोत्सवासाठी येताना टोल माफ सुविधा देणे, त्यांच्या पासेसची व्यवस्था आणि प्रवासाचे नियोजन,तसेच त्यांची कोविड-19 ची तपासणी करणे आणि त्याचा खर्च शासनाने करावा अशा विविध विषयांवर सविस्तर बैठकीत चर्चा करण्यात आली.


कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची विशेष काळजी घेण्यात येईल. चाकरमान्यांनी गणपतीला आलेच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यांना कोकणात येण्यास विरोध नाही त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेहीश्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading