Saturday, June 20, 2026
ENTERTAINMENT

‘मॅडम सर’च्‍या कलाकारांचा वास्‍तविक जीवनातील महिला पोलिसांना सलाम

यंदाच्‍या वर्षाच्‍या सुरूवातीला सोनी सबने ‘मॅडम सर’ मालिका सुरू केली. ही मालिका चार डायनॅमिक महिला पोलिस अधिका-यांच्‍या दृष्टिकोनांमधून सामाजिक समस्‍यांचे निराकरण करते. या चारही महिला पोलिस अधिकारी ‘जजबात’सह, म्‍हणजेच भावनिकपणे त्‍यांच्‍याकडे येणा-या केसेसचे निराकरण करतात. या मालिकेमध्‍ये एस.एच.ओ. हसीना मलिकच्‍या भूमिकेत गुल्‍की जोशी,सब इन्‍स्‍पेक्‍टर करिष्‍मा सिंगच्‍या भूमिकेत युक्‍ती कपूर,हेड कॉन्‍स्‍टेबल पुष्‍पाच्‍या भूमिकेत सोनाली नाईक आणि कॉन्‍स्‍टेबल संतोषच्‍या भूमिकेत भाविका शर्मा हे कलाकार आहेत.

रील लाइफमध्‍ये सादर करण्‍यात येणा-या आव्‍हानांचे सराईतपणे निराकरण करण्‍याचे गुपित जाणून घेण्‍यासाठी ‘मॅडम सर’ची टीम व अभिनेत्रींनी वास्‍तविक जीवनातील महिला पोलिस अधिका-यांना खास भेट दिली. कलाकारांनी पडद्यावर महिला पोलिसांना सुरेखपणे सादर करण्‍याच्‍या बारकाव्‍यांबाबत देखील चर्चा केली. तसेच त्‍यांनी सध्‍याच्‍या आव्‍हानात्‍मक काळादरम्‍यान आपली सुरक्षा व स्‍वास्‍थ्‍यासाठी मोलाचे योगदान देणा-या वास्‍तविक जीवनातील महिला पोलिस अधिका-यांचे आभार देखील मानले.

गुल्‍की जोशी ऊर्फ एस.एच.ओ. हसीना मलिक:

”मी ‘मॅडम सर’साठी माझ्या ऑडिशनदरम्‍यान प्रतिष्ठित गणवेश परिधान केला तेव्‍हा मला माहित नव्‍हते की, माझी भूमिकेसाठी निवड होईल. पण पोलिस अधिका-याचा गणवेश परिधान करण्‍याची दुर्मिळ संधी मिळाल्‍यामुळे मला अभिमान वाटला. मला हसीना मलिकची भूमिका मिळाल्‍यानंतर खूप आनंद झाला, पण त्‍यासोबतच भूमिकेला न्‍याय देण्‍याची आणि आपल्‍या हिरोंना अत्‍यंत आदरासह सादर करण्‍याची जबाबदारी देखील आली. गेल्‍या काही महिन्‍यांमध्‍ये माझ्या मनात पोलिस दलाबाबत खूप आदर निर्माण झाला आहे. त्‍यांनी प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करत समाजाला सुरक्षित ठेवण्‍यासाठी निरंतर व साहसी प्रयत्‍न केले आहेत. मला अशा दलाला सादर करण्‍याची संधी मिळाल्‍याने खूप अभिमान वाटत आहे. मोलाचे योगदान दिलेल्‍या या पोलिस दलाला माझा सलाम! त्‍यांनी हे शब्‍द खरे ठरवले आहेत – कुछ बात है क्‍यूंकी जजबात है.”

सब इन्‍स्‍पेक्‍टर करिष्‍मा सिंग म्‍हणून ओळखली जाणारी युक्‍ती कपूर

”मी देशभरातील आपल्‍या पोलिस दलांविषयी कृतज्ञता व आदर करते. या काळादरम्यान त्‍यांची समाजाप्रती समर्पितता दिसून आली आहे. आपण आपल्‍या घरामध्‍ये सुरक्षित असण्‍यामागील एकमेव कारण म्‍हणजे लोक सुरक्षित असण्‍यासोबत सर्वकाही सुरळीत असण्‍यासाठी ते प्रत्‍यक्ष आघाडीवर लढा देत आहेत. ते त्‍यांच्‍या कुटुंबांपासून दूर आहेत आणि त्‍यांनी आपल्‍या संरक्षणासाठी त्‍यांचे जीवन धोक्‍यामध्‍ये टाकले आहे. मी पोलिस दलाची या मोलाच्‍या योगदानासाठी नेहमीच कृतज्ञ राहिन. मला मालिका ‘मॅडम सर’मध्‍ये पोलिस अधिकारीची भूमिका साकारण्‍याची संधी मिळाल्‍याने खूप अभिमान वाटत आहे. आमची मालिका मनापासून पोलिसांचे कौतुक करते आणि गेल्‍या काही महिन्‍यांमध्‍ये हे मोठ्या प्रमाणात दिसून आले आहे. मी आपल्‍या देशातील प्रत्‍येक पोलिसाचे त्‍यांच्‍या नि:स्‍वार्थ योगदानासाठी आभार मानते. त्‍यांचे जजबात व धैर्याला माझा सलाम!”

हेड कॉन्‍स्‍टेबल पुष्‍पा सिंग म्‍हणूनओळखली जाणारी सोनाली नाईक

”मी या मालिकेची निर्मिती करण्‍यासाठी सोनी सबच्‍या संपूर्ण टीमचे आभार मानते. व्‍यस्‍त कामकाज असताना देखील आम्‍हाला भेटण्‍यासाठी आलेल्‍या महिला पोलिस अधिकारीचे आभार. पोलिस करत असलेले कार्य जाणून घेण्‍याची ही संधी मिळाल्‍याने मला खूप अभिमान वाटत आहे. मी या आव्‍हानात्‍मक काळादरम्‍यान अथक मेहनत घेणा-या पोलिस अधिका-यांचे मनापासून आभार मानते.”

भाविका शर्मा ऊर्फ सॅस्‍सी संतोष

”मी महिला पोलिस स्‍टेशनमधील सर्वात लहान पोलिस अधिकारी आहे. मी यासारखा अनुभव मिळण्‍यासारखे दुसरे कशाचीच अपेक्षा करू शकत नाही. मालिकेमध्‍ये मी नेहमीच हसीना व करिष्‍माकडून प्रेरणा घेतली आहे. पण आज मला आपल्‍या सुरक्षिततेसाठी निरंतर काम करत असलेल्‍या वास्‍तविक जीवनातील महिला पोलिस अधिकारींकडून प्रेरणा घेण्‍याची संधी मिळाली.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading