Sunday, June 21, 2026
PUNE

आयडीएमएस – जर्म शिल्ड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी नवीन तंत्रज्ञान

९० दिवसांपर्यंत सर्व प्रकारच्या व्हायरस पासून संरक्षण

पुणे, दि. १० – आज कोविड-१९ ने जगभरात थैमान घातले असुन ह्या संकट काळात हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी एक बातमी नवीन आशा घेऊन आली आहे . यूएसएच्या पेटंट टेक्नॉलॉजी ने आयडीएमएसच्या बॅनरखाली भारतात प्रवेश केला आहे . पुण्यातील (National Secretariat of Hospitality Industry of India) हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीच्या राष्ट्रीय सचिवालयात ग्राहकांच्या सुरक्षेसाठी जर्म शिल्ड ह्या अनोख्या तंत्रज्ञानाचे सामान्य मानदंड तयार करण्यात आले आहेत.

“आयडीएमएसचे अध्यक्ष मनोज तायडे म्हणतात, एंटी मायक्रोबायल कोटिंग सर्व्हिसेसपैकी एक अशी सुविधा आहे जी यापूर्वी कधीही न पाहिलेले नविन तंत्रज्ञान आणि विज्ञान आधारित सुविधा व सुरक्षा प्रदान करते. हे नवीन तंत्रज्ञान सुविधा व्यवस्थापनास पुढच्या स्तरावर नेण्यासाठी तयार आहे आणि आज काळाची गरज आहे. तसेच आज सामान्य जीवनाचा नवीन एक भाग देखील आहे ”.
चौरस फूट आधारावर व माफक दारात उपलब्ध अश्या या उत्पादनाचा वापर टेबल, खुर्च्या, डेस्क, फ्रंट ऑफिस एरिया, खोल्या, किचन परिसर, जेवणाचे क्षेत्र, विशेष झोन यासह हॉटेल परिसरातील पृष्ठभागावर लागू केल्यास ग्राहकांना व्हायरस पासून खात्रीशीर सुरक्षा मिळते. यामुळे ९० दिवसांपर्यंत सर्व प्रकारच्या व्हायरस पासून संरक्षण मिळते असा संघटनेचा दावा आहे.
“आयडीएमएस मॅनेजमेन्ट ने थेट प्रात्यक्षिकांद्वारे या उत्पादनास विश्वासू बनविले आहे. ग्राहकांना त्वरित सुरक्षा देऊन जंतूंचा नाश करण्यास हे उत्पादन पूर्णपणे सक्षम आहे, असे मनोज तायडे यांनी पुढे सांगितले.
“हे तंत्रज्ञान ग्राहकांच्या सुरक्षेच्या बाबतीत हॉटेल इंडस्ट्री आणि हॉटेल मालकांसाठी सर्वात जास्त लाभदायी आहे . यामुळे ग्राहकांना उच्च सुरक्षिततेसह हॉटेल सुविधांचा आनंद घेण्यास आत्मविश्वास मिळेल. ग्राहकांच्या सुरक्षिततेलाही चालना मिळेल, ” असे मत – एनयुएचआयआय आणि एचआयआय चे अध्यक्ष सानी अवसरमाल यांनी व्यक्त केले आहे.
पुणे, मुंबई, नागपूरसह महाराष्ट्र आणि भारताच्या सर्व कानाकोपर्यात देखील या कार्यालयांचा विस्तार आहे. या पथकात वरील कंपन्यांचे संचालक म्हणून कारशान दुबेरिया, विपणन संचालक उत्कर्ष खोंडाले, कपिल मासिरकर मुख्य कार्यकारी अधिकारी, मंगेश शहापूरकर संचालक, किरण कुलकर्णी (आयआयटी बॉम्बे चॅनेल पार्टनर) यांचा समावेश आहे. हे उत्पादन कार आणि दुचाकींवर देखील प्रभावी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading