fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

लीला पुनावाला फाउंडेशन तर्फे आत्तापर्यंत  १०००  + पेक्षा जास्त कुटुंबांना अन्नपदार्थ आणि आवश्यक वस्तूंचे वाटप

पुणे, दि. ७ – करोना मुळे आज बरीच कुटुंब आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडली आहेत. दैनंदिन खर्च जीवन आवश्यक गोष्टी परवडेनाश्या झाल्या आहेत कित्येक लोकांचे रोजगार बंद झाले आहेत. म्हणुनच लीला पुनावाला फाऊंडेशन अश्या गरजू कुटंबाना मदद करण्यासाठी पुढे सारसावले आहे. लीला पुनावाला फाउंडेशन तर्फे आत्तापर्यंत १००० हून अधिक कुटुंबांना अन्नपदार्थ आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना मुळे आज येणारा प्रत्येक दिवस जगण्याची नवीन आव्हाने घेऊन येतो आहे. दिवसेंदिव सर्वत्र आणखीणच भीत पसरते आहे. डोक्यावर छप्पर आणि अन्न असणे ही आता एक गरज बनली आहे. गोष्टी हाताबाहेर गेल्यामुळे लॉकडाऊन वाढण्याची भीत सर्वांनाच वाटू लागली आहे. अश्या परस्थिती मध्ये लीला पुनावाला फाउंडेशन वंचितांची काळजी घेण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे.


अलीकडेच फिरोज पुनावाला ( संस्थापक विश्वस्त, लीला पुनावाला फाउंडेशन, एलपीएफ), यांनी आपले भागीदार अॅनसिस सॉफ्टवेयर प्रा. लिमिटेड यांच्या सहयोगाने फाऊंडेशन तर्फे शिष्यवृत्ती मिळवणार्या आणि ज्यांना या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे अशा 150 मुलींच्या कुटुंबांना धान्य वाटप केले. या वेळी फाऊंडेशनच्या मुली आणि त्यांच्या कुटुंबियांना एक महिन्याची रेशन पुरवठा करण्यात आला, ज्यामुळे या कुटुंबांना त्यांच्या मूलभूत गरजा पुर्ण करता येतील. यापुर्वी ही फाऊंडेशनने कोवीड १९ विरोधात लढ्यात सहभागी होऊन कित्येक पीडित कुटुंबांची मदत केली आहे.

यामध्ये दररोजच्या वापरासाठी आवश्यक आणि एक महिन्याहून अधिक काळ टिकणार्या वस्तुंचे वितरण केले गेले. जसे गव्हाचे पीठ, तेल, तांदूळ, वाटाणे, हरभरा, रवा, शेंगदाणे, तांदूळ, गूळ, साखर, बिस्किटे. यावेळी फिरोज पुनावाला म्हणाले, आतापर्यंत एलपीएफने 1000 हून अधिक गरीब मुलींच्या कुटुंबांना आवश्यक किराणा वितरण केले आहे आणि परिस्थिती सामान्य होईपर्यंत हे काम सुरूच आहे. गरजू कुटुंबाना आमच्याकडून नेहमिच शक्य ती मदत मिळेल.

रफिक सोमानी, एरिया व्हाईस प्रेसि़डेंट भारत आणि साऊथ एशिया पॅसिफिक अॅनसीस म्हणाले, “आम्ही नेहमीच समाज हितांमध्ये योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहोत. लीला पुनावाला फाऊंडेशनला एक चांगल्या कार्यास पाठिंबा देऊन एक छोटी परंतु महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यास मिळाली यासाठी आम्ही आनंदी आहोत. आम्ही आशा करतो की या प्रयत्नामुळे गरजूंना या कठीण परिस्थिती मध्ये उपजिवीका पुर्ण करण्यास मदत होईल. लीला पुनावाला फाऊंडेशनच्या सक्रिय कार्याचे आम्ही कौतुक करू इच्छितो .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading