सलग तिसऱ्या दिवशी राज्यात 5 हजारपेक्षा जास्त कोरोनाबधित
मुंबई, दि. 27 – सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 5 हजारांहून अधिक वाढ, रविवारी राज्यात 5493 रुग्ण आढळले असून 156 जणांचा मृत्यू झाला आहेत. तर पुणेकरांना किंचित दिलासा मिळाला आहे शनिवारी 812 रुग्ण आढळले होते व रविवारी 523 पर्यंत कमी झाले आहेत.

राज्यात शनिवारी 5318 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी राज्यात 5024 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 59 हजार 133 वर पोहोचली आहे. यापैकी 84 हजार 245 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 67 हजार 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल एकूण 4 हजार 430 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.94 टक्के एवढं आहे. राज्यात काल 167 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख २३ हजार ५०२ नमुन्यांपैकी १ लाख ६४ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१७.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ९६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५१ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले ६० मृत्यू हे मुंबई मनपा-२३, ठाणे मनपा-२,नाशिक-३, नाशिक मनपा-५, पुणे मनपा-२०, सोलापूर मनपा-४, सांगली-१, रत्नागिरी-१. या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
पुणे २८ जून कोरोना आकडेवारी
………
– दिवसभरात ५२३ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ३२८ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात २२ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
– ३२४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ५४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १६१२५.
(डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-१५३१४ आणि ससून ८११)
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ६०६५.
– एकूण मृत्यू -६१३.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ९४४७.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६९३.
