आझम कॅम्पसमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात
पुणे,दि. २१ – महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे रविवार ,दिनांक २१ जून रोजी सकाळी ७ वाजता ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ ऑन लाईन प्रात्यक्षिकाद्वारे साजरा करण्यात आला. एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
क्रीडा मार्गदर्शक शबनम पीरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी – विद्यार्थिनीनी घरातूनच ऑन लाईन योग प्रात्यक्षिके सादर केली. त्याचा सराव अनेक दिवस सुरु होता.संस्थेच्या सर्व ३१ शैक्षणिक आस्थापनांमध्ये त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी आपापल्या योग सहभागाचे व्हिडीओ संस्थेकडे पाठवायचे आवाहन करण्यात आले .एकूण १६ योग प्रकार या उपक्रमात सादर करण्यात आले,अशी माहिती आझम स्पोर्ट्स अकादमी चे संचालक गुलझार शेख यांनी दिली.