fbpx

सांगितीक कार्यक्रमातून प्रिझम फाऊंडेशनला आर्थिक मदत

जोहर चुनावाला फाउंडेशन आणि किशोर सरपोतदार यांच्या तर्फे हिटस आॅफ किशोर कुमार आणि कुमार सानू ‘ कार्यक्रम

पुणे, दि. १६ – सध्याच्या कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मुलांसाठी काम करणाºया संस्था अडचणीत आहेत. त्यामुळे विशेष मुलांसाठी कार्यरत असलेल्या प्रिझम फाउंडेशनच्या शाळांना आर्थिक अडचणींना हातभार लागावा ,या हेतूने जोहर चुनावाला फाउंडेशन आणि किशोर सरपोतदार यांच्या तर्फे हिटस आॅफ किशोर कुमार आणि कुमार सानू ‘या सांगितिक कार्यक्रमाचे आॅनलाइन आयोजन करण्यात आले होते.

जोहर चुनावाला यांनी २० हजार रुपयांचा धनादेश प्रिझम फाउंडेशनचे विश्वस्त किशोर सरपोतदार यांना सुपूर्त केला. या वेळी पुणे म न पा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने व दत्त मंदिर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त शिरीष मोहिते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सम्वयक म्हणून अजित कुमठेकर यांनी काम पाहिले.

पावसाची अनुभूती देणारे रिमझीम रिमझीम…दीवार चित्रपटातील किशोर कुमार यांच्या आवाजातील कह दू तुम्हे…कुमार सानू यांच्या आवाजातील दिल है की मानता नही.. आराधना चित्रपटातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाजलेले कोरा कागज था ये मन मेरा….मेरे सपनोकी रानी कब आयेगी तू आदी गीते सादर करण्यात आले. मकरंद पाटणकर, मोनाली दुबे, अनुश्री घोरपडे, राजेंद्र दिक्षीत यांनी गायन केले. चिंतन मोढा, हर्षद गनबोटे, आनंद घोदरे यांनी संगीत दिले. आकाश सोलंकी यांनी निवेदन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: