fbpx

राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फ़े महिला कोविड योद्धांचा”मर्दानी महाराष्ट्राची” सन्मान

पुणे -दि. 16 – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाने कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांची मते ,सूचना जाणून घेण्यासाठी, तळागाळातील प्रश्न समजून घेण्यासाठी, ‘ राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ हा अनोखा उपक्रम राबविला आहे .या कोविड लढ्याचा सामना करताना येणाऱ्या काळात विविध प्रश्नांना तोंड देण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिलेले अभिप्राय मोलाचे ठरतील ,यासाठी सर्व पक्षाच्या सदस्यांना ,”राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय “या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले आहे.

पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त 22 मे रोजी ही मोहीम सुरू झाली होती .कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभाग नोंदवला. आत्तापर्यंत विविध माध्यमातून पाच लाखाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचलो असून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

कोरोना सारख्या भयंकर जीवघेण्या रोगांशी लढणाऱ्या राज्यातील महिलांचा सन्मान राष्ट्रवादी-काँग्रेस च्या वतीने पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त 10 जून पासून सुरु झाला .महाराष्ट्रातून 36 जिल्ह्यातून तालुकानिहाय किमान 22 महिलांना सन्मानपत्र ,सन्मानचिन्ह, श्रीफळ व शाल देऊन ,’ मर्दानी महाराष्ट्राची ‘ असा किताब देऊन गौरवण्यात आले. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, महिला पोलिस व त्यांचा स्टाफ, प्रशासकीय अधिकारी ,आणि महिला पत्रकार यांनी कोरोणा च्या युद्धात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कष्ट केले या सामाजिक बांधिलकी ची जाणीव ठेवून” महिला सन्माना चा” वारसा या उपक्रमांतर्गत जोपासला जाणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: