fbpx

कोरोनाच्या लढ्यात आर्थिक मदत देण्यासाठी सरसावलेले हजारो हात कोरोना योद्धाच – आ.चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. १५ – कोरोनाच्या लढ्यात विविध प्रकारे नागरिक मदत करत आहेत,या लढ्यात आर्थिक मदत करणारे ही एक प्रकारे कोरोना योद्धाच असल्याचे प्रतिपादन भाजप चे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.प्रभाग १३ मधील गिरीजाशंकर विहार सोसायटीच्या वतीने चंद्रकांतदादांना पंतप्रधान निधीसाठी २५०००/ तर महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री निधीसाठी २५०००/ रुपये मदतनिधीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला,यावेळी नगरसेवक दीपक पोटे,भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ,सारंग राडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
अनेक नागरिक मदतीसाठी पुढे येत आहेत आणि त्यामुळेच कोरोना विरुद्धची लढाई आपण लवकरच जिंकू असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
गिरीजाशंकर विहार सोसायटीचे संजय कबाडे (अध्यक्ष), रवींद्र गोखले (सचिव), आनंद शेलार (खजीनदार), काशीनाथ पटवेकर, अरुण दिघे (व्यवस्थापन समिती सदस्य) यांनी हे धनादेश सुपूर्द करताना आम्ही आमचे समाजाप्रतीचे कर्तव्य पूर्ण करत आहोत अशी भावना व्यक्त केली.

Leave a Reply

%d bloggers like this: