fbpx

अभिनेता सुशांत सिंह राजपूत पंचत्वात विलीन

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे कुटुंबिय, मित्र परिवार आणि सिनेक्षेत्रातील काही मोजकेच मान्यवर कलाकार उपस्थित आहेत. सुशांतचे पार्थिव दुपारी ४ वाजता अंत्यविधीसाठी कूपर हॉस्पिटलमधून पार्ल्यातील स्मशानभूमीत आणण्यात आले. मूळचा बिहारमधील पटनात राहणाऱ्या सुशांतचे वडिल आज दुपारी मुंबईत दाखल झाले होते. ते आधी ज्या घरात सुशांतचे आत्महत्या केली त्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये गेले. त्यांनतर कूपर हॉस्पिलटमध्ये मुलाच्या अंत्यदर्शनासाठी आले. सायंकाळी रुग्णवाहिकेतून सुशांतचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून स्मशानभूमीच्या दिशेने रवाना झाले. सुशांतचे वडिल, दोन बहिणी, अभिनेत्री श्रद्धा कपूर, गायक उदित नारायण यांच्यासह काही मित्र परिवार स्मशानभूमीत त्याच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना स्मशानभूमीत जाण्याची परवानगी होती. पार्ल्यातील सेवा समाज स्मशानभूमीत सुशांतवर अंत्यसंस्कार विधी पार पडले. यावेळी त्याचे सर्व कुटुंबिय आणि मोजके मित्र परिवार हजर होते.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ३४ वर्षी सुशांत नैराश्यातून हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. सुशांतचे आत्महत्या केली त्यावेळी त्याचे काही मित्र घरातच होते. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून त्याच्या मित्रांची तसेच सिनेक्षेत्रातील काही लोकांची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: