fbpx
Thursday, September 28, 2023
NATIONAL

बँकेत जमा केलेली ‘एवढी’ रक्कम असणार सुरक्षित, जाणून घ्या

नवी दिल्ली, दि. 12 – भारतीय स्टेट बँक (SBI) च्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. आता डिपॉजिट इंश्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) योजनेंतर्गत ग्राहकांचे 5 लाख रूपये पूर्णपणे सुरक्षित असतील. एसबीआयमधील सर्व ठेवी काही मर्यादा व शर्तींसह या योजनेत पूर्णपणे संरक्षित केल्या जातील. दरम्यान, याआधी केवळ 1 लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित असायची. एसबीआयने ट्वीटमध्ये म्हटले की, डीआयसीजीसी योजनेंतर्गत ग्राहकांच्या सेविंग, करंट अकाउंट, फिक्स डिपॉजिट, आणि रिकरिंग डिपॉजिटमध्ये असलेले 5 लाख रुपये काही मर्यादा व शर्तींसह पूर्णपणे संरक्षित आहेत.

माहितीनुसार, 5 लाखांपर्यंतच्या विमा रक्कमेमध्ये मूळ रक्कम आणि व्याज समाविष्ट असेल. पूर्वी ही रक्कम फक्त 1 लाख असायची. या रकमेमध्ये लिक्विडेशन / बँक परवाना रद्द करण्याची तारीख किंवा जमा करण्याची तारीख किंवा त्या तारखेला बँकेने जमा केलेले प्रिन्सिपल आणि व्याज रक्कम दोन्ही समाविष्ट आहे. ज्यावर अंमलबजावणी / विलीनीकरण / पुनर्रचना योजना लागू होते.

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने सोमवारी व्याज दरात कपात करण्याची घोषणा केली. एसबीआयने फंड लेन्डिंग रेटच्या मार्जिनल कॉस्ट म्हणजेच एमसीएलआरमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात करून 7 टक्क्यांपर्यंतची घोषणा केली. ही कपात सर्व प्रकारच्या कर्जासाठी घेण्यात आली आहे. पूर्वी हा दर वर्षाकाठी 7.25 टक्के होता. तसेच एसबीआयने आपला बेस रेट कमी करण्याची घोषणा केली. हा दर आता 8.15 टक्क्यांवरून 7.40 टक्क्यांवर आला आहे. बँकेने त्यात 75 बेसिस पॉईंट कमी केले आहे. हे सर्व नवीन दर 10 जून 2020 पासून लागू झाले. यामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या ईएमआयवरील भार कमी झाला

Leave a Reply

%d bloggers like this: