fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाला ९९ वे मानांकन

पुणे, दि. ११ – केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या नॅशनल इन्स्टिटयुशनल रॅकिंग फ्रेमवर्क’ (एन आय आर एफ ) या राष्ट्रीय मानांकन क्रमवारीत देशातील १०७१ अभियांत्रिकी महाविद्यालयात भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाला ९९ वे मानांकन मिळाले आहे.

भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी ही माहिती दिली .
‘उच्चशिक्षणाला पोषक वातावरण,उत्तम शिक्षणपद्धती,उत्तम शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळेच अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान देणे शक्य झाले आहे. भारती अभिमत विद्यापीठ संस्थापक स्व.डॉ.पतंगराव कदम, कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, सचिव डॉ.विश्‍वजीत कदम यांच्या पाठिंब्यामुळे,प्रोत्साहनामुळे भारती अभियांत्रिकी महाविद्यालयाने हे यश मिळविले आहे,असे त्यांनी सांगितले. भारती अभिमत विद्यापीठचे कुलपती डॉ . शिवाजीराव कदम ,सचिव डॉ . विश्वजित कदम ,कुलगुरू डॉ .माणिकराव साळुंखे यांनी भारती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अभिनंदन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: