fbpx

राज्यात ३,२५४ नवे कोरोनाचे रुग्ण तर १४९ जणांचा बळी! पुण्यात ३०४ रुग्णांची वाढ

मुंबई, दि. १० – राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडा जसा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तसाच मृतांचा आकडा देखील वाढत आहे. राज्यात मागील २४ तासांत कोरोनामुळे १४९ मृत्यू झाला असून ३ हजार २५४ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९४ हजार ४१ वर पोहोचला असून मृतांचा आकडा ३ हजार ४३८ झाला आहे. तसेच मागील २४ तासांत १ हजार ८७९ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत एकूण ४४ हजार ५१७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे शहरात आज ३०४ नवीन रुग्णांची भर पडली आहे, तर २७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज १४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- १२२ (मुंबई ९७, ठाणे १५, नवी मुंबई ५, उल्हासनगर ३, वसई-विरार २), नाशिक- ५ (जळगाव ५), पुणे- १० (पुणे १०), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ७), लातूर-१ (बीड १), अकोला -३ (अकोला २, अमरावती १), नागपूर-१ (गडचिरोली १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ९४ पुरुष तर ५५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १४९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ८७ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या १४९ रुग्णांपैकी १०४ जणांमध्ये (७० टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४३८ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ६६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  १८ एप्रिल ते ६ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ८३ मृत्यूंपैकी मुंबई ५८, ठाणे -९, नवी मुंबई – ५, जळगाव – ४,उल्हासनगर -३, वसई विरार – २,अमरावती – १ आणि गडचिरोली १ असे आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: