fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRA

कोरोनाः राज्य सरकार पूर्णतः अपयशी भाजप प्रवक्ते गणेश हाके यांचा आरोप

परभणी , दि.9 – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासह प्रभावी उपाययोजनाच्या अंमलबजावणीत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी मंगळवारी(दि.9) पत्रकार परिषदेद्वारे केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या-2 च्या प्रथम वर्षपुर्तीनिमित्ताने व भाजपाच्या धोरणा संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, माजी आ.मोहन फड आदीची उपस्थिती होती.
हाके म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अन्य राज्यापेक्षा महाराष्ट्र आघाडीवर आहे. विशेषतः देशाच्या तुलनेत 48 टक्के रुग्ण एकटया महाराष्ट्राचे आहेत. त्या गोष्टीस राज्य सरकारचे अपयशच पूर्णतः कारणीभूत आहे.
केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षापासून लोकविकास व लोककल्याणकारी अनेक योजना राबविल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेले निर्णय सुवर्णक्षराने लिहण्या सारखे आहेत. देशहितासाठी त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. विशेषतः कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बंल घटकांना मदतीसाठी केंद्र सरकारने तातडीने एक लाख 70 लाख कोटीची पंतप्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आतापर्यंत सुमारे 42 कोटी गरजूंना 53,248 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. कोटयावधी लोकांना मोफत धान्य, शेतक-यांच्या खात्यात थेट पैसे जमा करणे, गरीब कुटुंबाना मोफत गॅस सिलेंडर, जनधन खाते असलेल्या महिलांना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांग यांना थेट मदत असे उपाय केंद्र सरकारने केले. अर्थ व्यवस्था पुन्हा उभी राहावी म्हणून देश आत्मनिर्भर करण्याकरिता 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज केंद्रसरकारने जाहीर केलेे आहे,असे हाके म्हणाले.
370 रद्द करणे, तिहेरी तलाक वर बंदी घालणे, राम मंदिर बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन तसेच नागरिकत्वाचा सुधारणा कायदा वगैरे दिर्घ काळ प्रलंबीत प्रश्‍नाची सरकारने सोडवणुक केल्याचे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे, बाळासाहेब जाधव, नगसेविका मंगल मुद्गलकर, माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, सुनिल देशमुख, राधाजी शेळके, रितेश जैन, रमेशराव दुधाटे, डॉ.विद्या चौधरी, बालाप्रसाद मुंदडा, शिवाजीराव मव्हाळे, नगरसेवक मधुकर गव्हाणे, महानगर संघटनमंत्री संजय शेळके, भालेराव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading