fbpx

Unlock1.0 आजपासून मंदिर, हॉटेल्स, मॉल्स उघडणार

नवी दिल्ली, दि. ८ – देशात अनलॉक १.० ला आठवडा पूर्ण झाला आहे. मागिल ७५ दिवसांपासून बंद असलेले हॉटेल, रेस्तराँ, शॉपिंग सेंटर, आर्थिक कारभारासह धार्मिक विधी आता सुरू होतील. केंद्र सरकारचे दिशानिर्देश मिळताच दिल्ली, गुजरातसह १७ राज्ये-केंद्रशासित प्रदेशांत कंटेनमेंट झोनबाहेरील मॉल सुद्धा उघणार आहेत. परंतु महाराष्ट्रात अद्याप मॉल उघडण्यास परवानगी नाही. तर केरळ मध्ये मंगळवारी मॉल उघडतील.

देशातील ७ राज्ये-केंद्रशासित प्रदेशांत जूनमध्ये मॉल बंदच राहतील. पूजा-उपासना होत असलेली ८२० स्मारके सोमवारपासून सुरू करण्याची घोषणा सांस्कृतिक मंत्रालयाने केली. सर्वाधिक १११ स्मारके यूपीत सुरू होतील, तर कर्नाटकात ७५, महाराष्ट्रात ६५, मध्य प्रदेशात ६०, गुजरातेत ७७ स्मारक स्थळे सुरू होतील. या स्थळावर पूजा-उपासनेसाठी संख्या निर्धारित राहील व मास्क आवश्यक राहील.
सोमवारपासून आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, बिहार, चंदिगड, दिल्ली, गोवा, गुजरात, प. बंगाल, उत्तराखंड, यूपी, तेलंगण, राजस्थान, पंजाब, पुद्दुचेरी, कर्नाटक व हरियाणातील मॉल सुरू होतील. पंजाबमध्ये मॉलसाठी टोकन पद्धत लागू राहणार आहे.

हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, जम्मू-कश्मीर, नागालँड, मिझोराम, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांत निर्णय झालेला नाही तर महाराष्ट्र, झारखंड, मणिपूर, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, दमण-दीव या राज्यांत या महिन्यात मॉल बंद राहतील.

हे नियम आहेत लागू
हॉटेल : डिजिटल पेमेंट होईल : स्पर्शाविना चेक-इन आणि चक-आऊटची व्यवस्था करावी लागेल. खोल्यात ठेवण्यापूर्वी सर्व सामान निर्जंतुक केले जाईल.
मॉल : एसी २४ ते ३० अंश, आर्द्रता ४० ते ७० % ठेवावी लागेल. एलिव्हेटरवर मर्यादित संख्या निश्चित करावी लागेल. फूड कोर्टमधील निम्मी आसने रिकामी राहतील.
– मास्कविना पूजास्थळी प्रवेश नाही. मूर्ती-ग्रंथांना स्पर्श करता येणार नाही. घंटा वाजवण्यावर बंदी. बसून पूजा करण्यासाठी घरातून चटई न्यावी लागेल. प्रसाद, तीर्थ शिंपडण्यावर बंदी.
– रेस्तराँमध्ये बसून खाण्याऐवजी टेक अवेला उत्तेजन. होम डिलिव्हरी करणारे पार्सल दारात ठेवतील. त्यांच्या प्रवेशाच्या वेळी थर्मल स्क्रिनिंग होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: