fbpx

‘मिशन सागर’ अंतर्गत – ‘आयएनएस केसरी’, सेशेल्सच्या व्हिक्टोरिया बंदरावर पोहोचले

संपूर्ण जगभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाला आहे, हे लक्षात घेऊन भारत सरकारने आपल्या मित्र देशांना मदतीचा हात पुढे केला आहे. यासाठी भारताने ‘मिशन सागर’ अभियान सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय नौसेनेचे ‘आयएनएस केसरी’ हे जहाज आज सेशेल्सच्या व्हिक्टोरिया बंदरावर पोहोचले. कोविड-19च्या काळात सेशेल्सच्या लोकांना सहाय्यक ठरतील, अशा औषधांचा साठा या जहाजामार्फत पाठवण्यात आला आहे.

भारत सरकारच्यावतीने सेशेल्स सरकारकडे औषधी सोपवण्याचा अधिकृत समारंभ दि. 7 जून 2020, रोजी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सेशेल्स सरकारचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री, राजदूत बॅरी फ्योर आणि आरोग्यमंत्री मेरी पियर लॉयड हे उपस्थित होते. तर भारत सरकारचे प्रतिनिधित्व सेशेल्सचे भारतातले उच्चायुक्त जनरल दलबीर सिंह सुहाग, पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम (सेवानिवृत्त) आणि उच्चायुक्तामधले व्दितीय सचिव अश्विन भास्करन यांनी केले.

कोविड-19 महामारीच्या काळामध्ये भारत सरकारने आऊटरिच कार्यक्रमाअंतर्गत सेशेल्सला ही मदत करण्यात येत आहे. कोरोना महामारीबरोबर एकत्रित लढा देण्याबरोबरच दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठी ‘मिशन सागर’ मोहिमेतून भारत मदत करीत आहे. ‘सागर’ तैनात करण्यात आलेल्या सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासाची संधी उपलब्ध करून देण्याविषयी पंतप्रधानांच्या दृष्टिकोणाचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्याचबरोबर आयओआर देशांबरोबर  संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत अधिक महत्व देत असल्याचे अधोरेखित करीत आहे. ही मोहीम भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय आणि संबंधित इतर सरकारी संस्थांच्या समन्वयाने पार पाडण्यात येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: