fbpx
Monday, September 25, 2023
ENTERTAINMENT

साऊथच्या ‘या’ अभिनेत्याचे अवघ्या 39 व्या वर्षी निधन

इरफान खान आणि ऋषी कपूर या बॉलिवूड अभिनेत्या नांतर आता साऊथ इंडस्ट्रीनेही आपला एक अभिनेता गमावला आहे. चिरंजीवी सर्जा असे या अभिनेत्याचे नाव असून त्याचे वय ३९ वर्ष होते. ७ जून रोजी अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वृत्तानुसार, अभिनेत्याला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्याला बंगळुरूच्या जयनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे अभिनेत्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनानंतर दक्षिण इंडस्ट्रीमध्ये शोकांतिका पसरली आहे.

चिरंजीवी सर्जा याच्या निधनाने त्याचे चाहते आणि चित्रपट जगातील सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. इतक्या कमी वयात अभिनेत्याचा मृत्यू झाल्याने प्रत्येकजण दु:खी आहे आणि सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. अभिनेता विवाहित होता आणि त्याच्या पत्नीचे नाव मेघना राज होते. तो अभिनेता ध्रुव सर्जाचा मोठा भाऊ होता आणि साऊथ इंडस्ट्रीमधील अ‍ॅक्शन किंग अर्जुन सर्जा यांचे पुतणे होते. तसेच कन्नड सिनेमामधील ज्येष्ठ शक्ती प्रसाद यांचे नातू होते.

दक्षिण इंडस्ट्री अभिनेत्याच्या निधनाने तीव्र दु:खी आहे. अभिनेत्री प्रियमिनी, अभिनेता विलास नायक आणि माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी अभिनेत्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. विलास नायक यांनी लिहिले- चिरंजीवी सरजा यांच्या मृत्यूच्या बातमीने फार दु:खी आणि धक्का बसला आहे. विश्वासच बसत नाही. एक प्रतिभावान तरुण अभिनेता आपण गमावला. देव त्याच्या कुटुंबाला सामर्थ्य देवो.

माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी लिहिले- चिरंजीवी सर्जा यांच्या मृत्यूच्या बातमीने दुखी आहे. एका तरुण टॅलेंटचा अंत लवकर झाला. अभिनेत्याला नम्र श्रद्धांजली.

Leave a Reply

%d bloggers like this: