fbpx

पावसाळ्यापूर्वी नाल्यातील कामे न होण्यामागे भ्रष्टाचार – नगरसेविका अश्विनी कदम

पुणे, दि. ६ – आंबिल ओढा भागात कालच्या एका दिवसाच्या पावसाने नागरिकांमध्ये परत या भयान आठवणी 25 सप्टेंबर आलेल्या पुराच्या ताज्या झाल्या. नाल्यावरील असलेल्या पुलांना पाणी स्पर्श करत होते हे बघुन नाल्या लगत राहणाऱ्या नागरिकांची अक्षरश झोप उडाली होती. या परिस्थितीला नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा आरोप नगरसेविका अश्विनी कदम यांनी केला.

कदम म्हणाल्या, नागरिकांनी स्वतःच्या घरातील किमती इलेक्ट्रॉनिक, मौल्यवान वस्तू या उंचीवर नेऊन ठेवल्या होत्या. टू-व्हीलर, फोर-व्हीलर सुरक्षित जागी नेऊन पार्क करून आले होते. काहींनी तर चार महिन्यासाठी स्वतःचं हे घर बंद ठेवून दुसरीकडे घर भाड्याने घेतले आहे तिथे जाऊन राहू लागलेत. अशी सगळी परिस्थिती एका दिवसाच्या पावसाने आज आंबील ओढ्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांवर आली आहे. पुढचे चार महिने अजून काढायचे आणि या सगळ्याला जबाबदार आहे ते पुणे महानगरपालिके भ्रष्ट कारभार. सातत्याने मी सभागृह असेल, लेखी मागण्या असतील किंवा सोशल मीडिया व वृत्तपत्रांच्या माध्यमातून आंबील ओढ्यातील सीमा भिंत बांधा, प्राईम मूव्ह प्रमाणे 22 मीटर नाला रुंद करा, आवश्यक पूल, पुतळे, स्ट्रक्चर काढा परंतु पुणे ह्या मागण्या करत होते. परंतु पुणे महानगरपालिकेने सगळी कामे अपूर्ण ठेवली आणि म्हणूनच आज ही सगळी आंबील ओढ्याच्या कडेला राहत असलेल्या नागरिकांवर ही वेळ आलेली आहे. आणि याला जबाबदार आहे तो सर्व निविदा प्रक्रियांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार. मग तो कलव्हर्ट बांधायचा असुदे ,राडारोडा, गाळ काढण्याचा किंवा सीमा भिंत बांधण्याचा किंवा असू देत या सगळ्या निविदा प्रक्रियांमध्ये भ्रष्टाचार होत राहिला आणि निविदा प्रक्रिया लांबत गेलाआणि पर्यायाने नाल्यातील कामे सुद्धा लांबत गेली. आणि आज सात आठ महिन्याने पावसाळ्याच्या तोंडावर कोणतेही नाल्यातील काम पूर्ण झालं नसल्यामुळे पुणेकर नागरिक आंबील ओढ्याच्या कडेने राहतात त्यांना अक्षरशः भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
माननीय आयुक्तांना नवीन असल्यामुळे याच्यातील काहीच कल्पना नाही परंतु आयुक्तांनी सुद्धा हि सर्व कामे का अपूर्ण राहिल्या याची चौकशी करून पूर्ण करावी आणि जे कोण याला जबाबदार असतील त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी तरच पुणेकरांना यातून सुटका मिळेल.

Leave a Reply

%d bloggers like this: