युक्रांदच्या वतीने येरवडा भागात रेशन वाटप
असंघटित घरेलु कामगारांच्या कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पुणे, दि. 4 – येरवडा येथील रेड झोन संक्रमित भागात घरेलु कामगार व असंघटित कामगारांना,धुणीभांडी करणाऱ्या महिला, सफाई कर्मचारी, कचरा वेचक महिलांना आणि कुटुंबाला युवक क्रांती दलाच्या वतीने रेशन कीट आणि जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.युक्रांद शहर उपाध्यक्ष सुदर्शन चखाले यांच्या समवेत
राकेश गजघाटे , सचिन हिवाळे , सागर घोलप यावेळी उपस्थित होते.रेशन कीट मध्ये तांदुळ, डाळ, साखर, तेल, मिठ, चहा पावडर, साबण, बिस्किट पॅकेट, कांदे, बटाटे, कुरमुरे पॅकिट असे जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता .
