fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

खिलारेवाडी तरुण मंडळाच्या रक्तदान शिबिरात ८० बाटल्या संकलित

पुणे, दि.31 – खिलारेवाडी तरुण मंडळ प्रभाग १३ एरंडवणा हॅपी कॉलनी येथील समाजकार्यात अग्रेसर असलेल्या मंडळाचे अध्यक्ष अजय मारणे आणि सुनिल गांगरकर यांचा वाढदिवस – कोरोना मुळे रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या निमित्ताने मंडळाने आज रक्तदान शिबीर आयोजित केले होते.यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक दीपक पोटे,क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर,सामाजिक कार्यकर्ते महेश पोटे ,कपिल बागुल ,सचिन काळे व लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू हनुमंत पवार,संजय (लाला ) कानगुडे* यांच्यासह प्रदीप ठोंबरे,श्याम भोसले,बाळासाहेब डोख,अजय ठोंबरे,अनिकेत मराठे,निखिल धिडे,अशोक काशीकर,सुनिल गांगरकर,नितीन कोळेकर,ऱविंद्र बने,जयदीप कुंबरे,सुनिल कदम,शुभम कंधारे,दशरथ कुले,मंगलताई मिश्रा,लताताई जोशी,पुष्पाताई मारणे* व सर्व कार्यकर्ते खिलारेवाडी तरुण मंडळ उपस्थित होते. पी एस आय ब्लड बॅंकेच्या सहकार्याने आयोजित शिबिरात एकूण ८० बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: