कोरोनाग्रस्त रुग्णांना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने अन्नधान्याच्या किटचे वाटप
पुणे, दि. 31 – पुणे कॅन्टोन्मेंट विभागातील कोरोनाग्रस्त रुग्णांना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने अन्नधान्य किट वाटप चा कार्यक्रम न्यू मोदीखाना कॅम्प येथे संपन्न झाला. पुणे कॅन्टोन्मेंट येथील सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्याधर गायकवाड, डॉ.निखिल यादव यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम करण्यात आला.
या प्रसंगी राजाभाऊ चव्हाण, शशिधर पुरम,अमित मोरे, ऋषिकेश पवार,चंद्रकांत यादव, अतिश जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीपणे संयोजन करण्यासाठी आशिष जगताप,डेव्हिड मकासरे, आकाश चव्हाण,विजय कांबळे अविनाश कांबळे,प्रशांत मोहिते, संदीप भालेराव,कल्पना मकासरे, गीता चव्हाण,शशिकला उग्राल, बाबुराव शिर्के यांनी पुढाकार घेतला.