fbpx

“सेल्यूलर जेल अंदमान” येथे साजरी झाली सावरकर जयंती !!

पुणे, दि. 29 – सर्व जग लॉक डाऊन मध्ये अडकले असताना भारतासहित जगातील सर्व स्मारके आणि तीर्थ स्थळे देखील त्याला अपवाद ठरले नाहीत. अशा परिस्थितीत गेले अडीच महिने सेल्युलर जेल देखील बंद आहे. खरं तर आज स्वा. सावरकरांची १३७ वी जयंती आणि अशा महत्वाच्या दिवशी सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करणे ही खूप महत्वाची बाब आहे. आणि म्हणून शिवसंघ प्रतिष्ठानने केलेल्या अथक परिश्रमानंतर सेल्युलर जेल च्या आवारात असलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्यास शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिन्ग पाळत पुष्पांजली अर्पण करण्यात आली. अशी माहिती अंदमान अभिवादन यात्राचे प्रणेते कॅप्टन निलेश गायकवाड यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: