fbpx

यंदाच्या पंढरपूर वारी बद्दल मोठा निर्णय

पुणे, दि. 29 -यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्यातून आणि सर्व प्रमुख संतांच्या पालख्यांचे समवेत एकही दिंडी निघणार नाही. असा निर्णय राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील बैठकीत जाहीर केला आहे. प संतांच्या पादुका या हेलिकॉप्टर अथवा एसटी बसने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरात येणार आहेत. यंदाच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी संतांचे पालखी सोहळे निघणार की नाहीत ? याबाबत आज पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आळंदी आणि देहू संस्थांचे पदाधिकारी तसेच सर्व प्रमुख मानाच्या संतांच्या संस्थांचे पदाधिकारी आणि पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त उपस्थित आहेत

.fb_img_15907553750781107031734489575983.jpg

15 मे रोजी पुणे येथे आळंदी आणि देहू संस्थानच्या विश्वस्त समवेत उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. यानंतर वारकऱ्यांनी यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी दिलेले पर्याय. आणि शासनाच्या वतीने आरोग्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले पर्याय हे राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांच्या चर्चेनंतर निश्चित करण्यात आले. यानंतरच आजची पुणे याठिकाणी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा कुठल्याही प्रकारच्या दिंड्या निघणार नाहीत. असे जाहीर केले. तसेच सर्व प्रमुख मानाच्या संतांचे पालखी सोहळे हे एसटी महामंडळाच्या बस मधून अथवा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पंढरपुरात आषाढी दशमीला पंढरपुरात पोहोचतील. आणि आषाढ शुद्ध द्वादशीला सर्व संत विठुरायाचे दर्शन करून पंढरीचा निरोप घेणार आहेत. त्यामुळे सहाजिकच यंदा संतांचा पंढरपुरात दहा दिवस नव्हे तर केवळ 36 तासांचा मुक्काम असणार आहे. असेही या बैठकीत ठरवण्यात आले आहे.विशेष म्हणजे या निर्णयास सर्व वारकरी संप्रदाय आणि देहू आळंदीच्या विश्वस्तांनी देखील सहमती दर्शवली. तसेच यंदा सर्व संतांचे पालखीसोहळे वाहनातून आषाढी एकादशी पूर्वी पंढरपुरात पोहोचतील. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यातील आणि राज्याबाहेरील वारकऱ्यांना कोरोनामुळे येता येणार नाही. हे आता निश्चित करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: