fbpx
Thursday, September 28, 2023
ENTERTAINMENT

मराठी ‘रामायण’ची प्रसारण तारीख पुढे ढकलण्यात आली

स्टार प्रवाहवर पहिल्यांदाच मराठीतून भेटीला येणाऱ्या ‘रामायण’ या पौराणिक मालिकेची प्रचंड उत्सुकता आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे मालिकेची प्रसारण तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला आहे. यासंबंधीचं अधिकृत परिपत्रक स्टार प्रवाहकडून जाहीर करण्यात आलं आहे. 

मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत घराघरात पोहोचलेल्या स्टार प्रवाह वाहिनीने नेहमीच दर्जेदार मालिका सादर केल्या आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली ‘रामायण’ ही मालिका पहिल्यांदाच मराठीतून दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. रामानंद सागर निर्मित रामायण ही पौराणिक मालिका पहिल्यांदाच मराठी भाषेतून स्टार प्रवाहवर पहाता येणार आहे. या पौराणिक मालिकेची जादू इतक्या वर्षांनंतर तसूभरही कमी झालेली नाही. आजही प्रेक्षकांना ही मालिका तितकाच आनंद देते. रामायण ही फक्त मालिकाच नाही तर हा मनामनात रुजलेला संस्कार आहे. अलौकिक निष्ठा, पवित्र प्रेम, आणि असामान्य श्रद्धेची गोष्ट पहिल्यांदाच मराठीतून अनुभवायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असेल. लवकरच ही महामालिका स्टार प्रवाहवर सुरु होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: