fbpx

राज्य महिला आयोगाची अनुदानाची योजना नाही.

सोशल मिडियावरील मेसेजबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार

दि. २८ – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने अनुदानासाठी कुठलाही ॲानलाईन प्रस्ताव मागविलेला नाही. आयोगाच्या नावाने सदर आवाहन करुन शुल्क आकारणार्यांच्या विरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.

एनजीओंनी महिलांविषयक वेबिनार
करिता अनुदानासाठी ॲानलाईन अर्ज करावे असे आवाहन करणारा मेसेज सोशल मिडियावर पाठवला जात आहे. यात अधिक माहितीसाठी दिलेल्या https://imjo.in/MEhz8q या लिंकद्वारे रु ४५० शुल्क आकारत असल्याचे राज्य महिला आयोगाच्या निदर्शनास आले आहे. राज्य महिला आयोगाकडून असे कुठलेही आवाहन करण्यात आलेले नाही तसेच कुठलेही शुल्क आकारले जात नाही. राज्य महिला आयोगाच्या नावाने खोटे मेसेज करणार्या, पैसे घेणार्या या वेबसाईट विरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: