fbpx
Thursday, December 7, 2023
PUNE

भारती विद्यापीठ ‘आय.एम. ई. डी’ मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म

लॉक डाऊन काळात ६० वेबिनार यशस्वी

पुणे, दि. 28 – भारती विद्यापीठ ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ( आयएमईडी) मध्ये व्यवस्थापनशास्त्र,कॉम्प्युटर सायन्स विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी मोफत डिजिटल प्लॅटफॉर्म उभारण्यात आला असून ६० वेबिनार यशस्वी करण्यात आले असून आणि आंतरराष्ट्रीय कोर्सेस ‘ई डी एक्स’ संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले. ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डव्हलपमेंटचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

कोरोना विषाणू साथीच्या लॉक डाऊन काळात व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी दैनंदिन ऑनलाईन अध्यापनाच्या जोडीला हे वेबिनार,आंतरराष्ट्रीय कोर्सेस उपलब्ध करण्यात आले आहेत. वेबिनारच्या विषयामध्ये मनुष्य बळ व्यवस्थापन,सायबर सिक्युरिटी,ऑनलाईन मार्केटिंग,कृत्रिम बुद्धिमत्ता,ताण तणाव व्यवस्थापन,कल्पकता आणि नावीन्य,कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कौशल्ये अशा अनेक विषयांचा समावेश होता.
जगातील नामवंत शैक्षणिक संस्था आणि कंपन्यांचे हे कोर्सेस(अभ्यासक्रम) ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहेत. यात हार्वर्ड,एमआयटी,बर्कले,आय.आय.टी. मुंबई,आय.आय.एम.बंगळूरू,आय.बी.एम यांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे .

आय.एम.इ.डी.तर्फे व्यवस्थापनशास्त्राच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्लेसमेंट प्रक्रिया राबवली जात आहे. लॉक डाऊन उठल्यावर लगेचच हे विद्यार्थी निवडल्या गेलेल्या कंपनी मध्ये रुजू होऊ शकतील,अशी माहिती डॉ.सचिन वेर्णेकर यांनी दिली.

आय एमईडीच्या या यशाबद्दल भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, सचिव डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

%d