fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

कोविड योद्धांसाठी एम पी ग्रूप तर्फे १०००० मास्क प्रदान

पुणे, दि. 28 – कोरोनाच्या संकटकाळात हजारो हात मदतीसाठी धावून येत आहेत आणि फिल्ड वर काम करताना पदोपदी माणुसकीचा प्रत्यय येत आहे असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.विविध संस्था ,संघटना , अगदी सामान्य माणसे सुद्धा आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत असून लोकांची मदत करण्याची भावना बघून गहिवरून येते असेही ते म्हणाले.

एम पी ग्रूपच्या वतीने क्रिएटिव्ह फौंडेशनच्या माध्यमातून पुणे मनपा मधील कोविड योद्धांसाठी १०००० मास्क देण्यात आले त्यावेळी महापौरांनी या भावना व्यक्त केल्या.यावेळी एम पी ग्रूपचे मानद संचालक संदीप खर्डेकर,क्रिएटिव्ह फौंडेशनच्या विश्वस्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,पुणे मनपाच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त सुनिल इंदलकर,क्रिएटिव्ह फौंडेशनचे विश्वस्त प्रतीक खर्डेकर इ उपस्थित होते.
एम पी ग्रूपचे संस्थापक मधुकर पाठक व चेयरमन अभिषेक पाठक यांनी सांगितले की एम पी ग्रूप फील्ड वर काम करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी मदत करेल.एम पी ग्रूप तर्फे परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी बसेस ची व्यवस्था देखील करण्यात आली असे अभिषेक पाठक यांनी सांगितले.
क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी कवितेच्या पंक्ती उधृत करत आपल्या भावना व्यक्त केल्या ” कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती,भेद विरावे स्फुरण चढावे नवशुभ आकांक्षांनी ॥ उठता आपण नमतिल विघ्ने महाभयंकर आता,काय न केला आपण मर्दन तुंग हिमाचल माथा ?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती असून सावरकर म्हणतात – *देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो* या भावनेनेच एम पी ग्रूप आणि क्रिएटिव्ह फौंडेशन कार्यरत असून गत दोन महिन्यात गरजूं साठी अनंत उपक्रम राबविल्याचे ही त्यांनी सांगितले.
वस्ती विभागात अद्याप नागरिक मास्क वापरणे,सुरक्षित अंतर राखणे याचे पालन करत नसून मा.महापौरांनी पुणे मनपा मार्फत ग्रीन झोन मधील वस्त्यांमध्ये जनजागृती अभियान राबवावा अशी सूचना नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: