fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

मसापचा ११४ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन

पुणे : साहित्य परिषदेचा वर्धापन दिन म्हटलं की परिषदेच्या टिळक रस्त्यावरील वास्तूला केली जाणारी विद्युत रोषणाई,,आकर्षक रांगोळ्या,इतर भाषेतील नामवंत साहित्यिकांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी नवोदित आणि मान्यवर लेखकांची उपस्थिती, सनईच्या सुरात साहित्यरसिकांचे मोगऱ्याची फुले देऊन आणि अत्तर लावून केले जाणारे स्वागत असे चित्र असते यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परिषदेने प्रसिद्ध हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या उपस्थितीत होणारा वर्धापन दिन कार्यक्रम रद्द केले परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मुखपट्टी लावून आणि भौतिक अंतर राखत मसापचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्या हस्ते फक्त दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार कार्यवाह प्रमोद आडकर, उद्धव कानडे, बंडा जोशी, दीपक करंदीकर उपस्थित होते

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले परिषदेला साहित्यभिमुख आणि लोकाभिमुख करताना परिषदेने अनेक दर्जेदार कार्यक्रम रसिकांना दिले त्याचबरोबर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेला पाठपुरावा, दिल्लीत जाऊन उठविलेला आवाज, मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा व्हावा यासाठी घेतलेला पुढाकार, मुंबईत झालेल्या धरणे आंदोलनात नोंदविलेला लक्षणीय सहभाग ,संमेलन अध्यक्ष पद सन्मानाने दिले जावे याच्या घटना बदलासाठी घेतलेली आग्रही भूमिका,गेली पाच वर्षे साहित्य सेतूच्या सहकार्याने घेतलेल्या लेखन कार्यशाळा या गोष्टी परिषदेच्या कृतिशीलतेच्या निदर्शक आहेत.

कोरोना संकटाचे सर्वच क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार असून साहित्य क्षेत्रही त्याला अपवाद असणार नाही भविष्यात साहित्य संस्था, लेखक, प्रकाशक, संपादक, चित्रकार, मुद्रितशोधक, छपाई प्रक्रियेतील सर्व घटक, ग्रंथ वितरक आणि ग्रंथ विक्रेते यांनी परस्परांशी सतत संवाद साधून सामूहिक प्रयत्नातून येणाऱ्या आव्हानांचा सामना केला पाहिजे मसाप त्यासाठी पुढाकार घेईल.

गेल्या पाच वर्षांपासून प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या साहित्य सेतूच्या सहकार्याने परिषद तंत्रस्नेही झाली असून या पुढे गर्दी टाळण्यासाठी परिषदेचे कार्यक्रम रसिकांना यू ट्यूब आणि फेसबुक या माध्यमातून घरबसल्या पाहता येतील. भविष्यातील सर्व आव्हाने पेलण्यास परिषद सज्ज आहे

Leave a Reply

%d bloggers like this: