माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण

नांदेड. देशभर कोरोनाचा हाहाकार सुरू असताना महाराष्ट्र या व्हायरसचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारसाठी एक वाइट बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना टेस्टसाठी त्यांच्या स्वॅबचे नमुणे पाठवण्यात आले होते ते रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना उपचारासाठी नांदेड येथून मुंबईला नेले जात आहे.ते आज मुंबईकडे रवाना झाले. तेथील सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील अशी माहिती आहे.
नांदेड जिल्ह्यात रविवारी कोरोना व्हायरसचे एकूण दोन नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे, आता जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 127 झाली आहे. तत्पूर्वी राज्य सरकारचे आणखी एक मंत्री जितेंद्र आव्हाड यांना देखील कोरोनाची लागण झाली. ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत.
दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला आहे. रविवारी(दि.24) राज्यात 3,041 नवीन रुग्ण मिळाल्या नंतर राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 50,231 झाला आहे. तसेच, आज 58 कोरोना संक्रमितांचा मृत्यूही झाला आहे. आता राज्यातील मृतांचा आकाड 1,635 झाला आहे. रविवारी मृत्यू झालेल्या कोरोना संक्रमितांमध्ये 39 मुंबई, 6 पुणे, सोलापूर 6, औरंगाबादसे 4, लातूर 1, मीरा-भायंदर 1 आणि ठाण्यातील 1 रुग्णांचा समावेश आहे.