fbpx

मशीदीत न जाता घरी नमाज पठण करुन पुण्यात ईद साजरी

आझम कॅम्पस मशिदीत ईद नमाजचे’फेसबुक लाईव्ह’द्वारे थेट प्रक्षेपण !

पुणे : कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत ईद नमाजचे’फेसबुक लाईव्ह’ द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले.मशीदीत न जाता घरी मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शना खाली नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले.अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे. 

आझम कॅम्पस शैक्षणिक परिवाराचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली. 
चंद्र दर्शना नुसार पुण्यात २५ मे रोजी ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये तसेच ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केले जाते.त्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात.कोरोना संसर्गचा  धोका लक्षात घेऊन  या वर्षी मशिदीत जाता येणार नाही,याची कल्पना सर्वाना होतीच.त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा सुखद धक्का बसला.आझम कॅम्पस या फेसबुक पेज वर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्यात आले.  
ईद च्या दिवशी सकाळी ८ वाजता आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद यांनी ईद साठीचे नमाज पठण केले.नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे सुरुवातीला नमाज पठण कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले.मग,ईद -उल -फित्र ची नमाज अदा करण्यात आली.त्यानंतर थोडक्यात खुतबा पढण्यात आला आणि दुआ सांगण्यात आली.पेश इमाम यांच्या पाठोपाठ हे लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या बांधवानी घरी  नमाज अदा केली. सुमारे ५ हजार बांधवांनी हे प्रक्षेपण सकाळच्या वेळी पाहिले.आझम कॅम्पस च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.  

Leave a Reply

%d bloggers like this: