परभणी जिल्ह्यातील रुग्णसंख्या 36 वर
नव्याने 14 कोरोनाबाधित रुग्ण
परभणी- जिंतूर तालुक्यातील सावंगी(भांबळे) येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असतांना रविवारी(दि.24)रात्री कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नव्याने14 वाढ झाली.
रविवारी सकाळपासून शासकिय अधिकारी नांदेड येथील प्रयोगशाळेकडून कधी अहवाल प्राप्त होतो,या प्रतिक्षेत होते.रविवारी दिवसभरही अहवाल प्राप्त झाला नाही.रविवारी प्रलंबित स्वॅबची संख्या दोनशेंवर पोहचली.
या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत दिवसेदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी मध्यरात्री नांदेड येथील प्रयोगशाळेमार्फत प्राप्त अहवालानुसार सावंगी(भांबळे) येथील एक महिला व परभणीतील एका तरूणीचा स्वॅब कोरोना पॉझीटीव्ह आढळून आला. परिणामी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखीन दोनने वाढ झाली. ती संख्या 22 पर्यंत पोहचली. त्यातच सावंगी येथील संशयित महिलेचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. अन् मध्यरात्री ती महिला कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्ह्यातही प्रचंड अस्वस्थता पसरली. विशेषत म्हणजे कोरोनाबाधित सर्व रुग्ण हे परजिल्ह्यातून आपल्या मुळगावी म्हणजे परभणी जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. त्यामुळेच
परजिल्ह्यातील व्यक्तींसह कुुटुंबियांच्या अधिकृतपणे-अनाधिकृतपणे प्रवेशामुळे या जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वदूरपर्यंत पसरला आहे. वातावरण चिंतेचे झाले आहे.
