fbpx

कोंढवा येथे सर्व धर्मियांना १ हजार लिटर दूध वाटप करून ईद साजरी पुणे : ईद -उल -फित्र (रमझान ईद ) निमित्त रविवारी सायंकाळी कोंढवा येथे सर्व धर्मियांना दूध वाटप करून ईद साजरी  करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते साबीर रहमान शेख यांनी हा उपक्रम केला. न्यू ग्रेस स्कुल कोंढवा येथे १ हजार लिटर दूध वाटप करण्यात आले.सोशल डिस्टन्स ठेवून हे वाटप करण्यात आले. साबीर शेख,जकीउद्दीन शेख,जावेद सय्यद,इमरान शेख,जावेद शेख,मुबीन ,अफझल हे कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले. घरची ईद साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतलेला होता ,त्यामुळे वाचलेले पैसे या सामाजिक उपक्रमावर खर्च करण्यात आले,असे साबीर रहमान शेख यांनी सांगितले. 

Leave a Reply

%d bloggers like this: