fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्यातर्फे 168 व्या महिलेची जटेतुन मुक्तता

पुणे, दि. 24 – महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्यातर्फे 168 व्या महिलेची जटेतुन मुक्तता करण्यात आली आहे. तळेगांव दाभाडे ता.मावळ येथील ,सुनिता गोपाळे (वय 40 वर्षे) असे या महिलेचे नाव असून तिच्या डोक्यात 12 वर्षाच्या असताना डोक्यात जट आली म्हणुन शाळा सोडावी लागली होती. अंनिसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी या महिलेची जटेमधून मुक्तता केली आहे.

दरम्यानच्या काळात सुनिता गोपाळे यांचे लग्न झाले.डोक्यात छोटी असलेली जट वाढत चालली होती.पदरात दोन मुलं त्यातील एका मुलाचा मृत्यु झाला. सुनिता यांच्या सासरच्या लोकांचे मत होते की ही आपल्या घरासाठी चांगली नाही.ही वेडी आहे असे म्हणुन तिला घरातुन हाकलुन दिले.तेव्हा पुढे काय करायचा हा प्रश्न पडला.धुणी भांड्याचे काम मागायला गेले की,डोक्यातील जट पाहुन त्यांना कोणी काम देत नव्हते.तेव्हापासुन सुनिता यांनी स्वतःचा उदरनिर्वाह बिगारी काम करून स्वतःचे पोट भरू लागल्या.जट वाढतच चालली होती.जटकाढायची तर 60,000 हजार रूपये खर्च येणार होता तो खर्च करण्याची परिस्थिती नव्हती.त्यामुळे गेली 28 वर्षे त्या जटेचे ओझे वाहत होत्या.
गेल्या वर्षी तळेगांव ढमढेरे गावातील एका महिलेचे जट निर्मूलन केलेल्या सुमनताईनी सुनिताच्या डोक्यातील जट पाहीली.तुला जट काढायची असेल तर नंदिनी जाधव यांना फोन कर. त्या तुझ्या डोक्यातील जट काढुन देतील.असे सांगीतले, सुनिताताई तिथे बिगारी काम करत होत्या तिथे पोहचलो असता.जट कुठे काढायचा हा प्रश्न होता.जिथे काम चालले होते तिथे जट काढण्यास नकार दिला.तेव्हा जवळच असणार्‍या मंदिरात जट काढण्याचे ठरले.तेथील मंदिराची पाहणी करणार्‍या सावंत ताईची परवानगी घेवुन त्या मंदिराच्या परिसरात सुनिताताईच्या डोक्यातील जट काढण्यात आली. 28 वर्षे जटेचे ओझे वाहणार्‍या सुनिता ताईची जट काढण्यास फक्त एक मिनिट लागला. जट निर्मूलन करताना महा.अंनिस,राज्यप्रधान सचिव, मिलिंद देशमुख,सावंतताई,दादासाहेब लाड(अंनिसचे युवा कार्यकर्ते) या सर्वाच्या उपस्थितीत सोशल डिस्टंन्सचे पालन करत जट निर्मूलन करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: